अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 28 फेब्रुवारीपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध तुर्तासतरी थांबण्याचे चिन्ह नाही. महत्वाचे म्हणजे, इराणने अपेक्षेपेक्षाही अधिक प्रखरपणे इस्रायल आणि अमेरिकेचा प्रतिकार करताना दिसत आहे. त्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आपली पकड एकदम घट्ट केली आहे. या मार्गावरून इंधन वाहून नेणाऱ्या जहाजांवर बंदी घालून इराणने जगात इंधन संकट तर निर्माण केलेच, पण आता त्याने आपली दुसरी चालही खेळली आहे.
जर युद्ध दीर्घकाळ चालले, तर...!
माध्यांतील वृत्तांनुसार, इराणने काही निवडक कार्गो जहाजांना होर्मुजमधून जाण्याची परवानगी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, या जहाजांवर मोठ्या प्रमाणावर अन्न-धान्य आणि कृषी उत्पादने आहेत. यावरून, जर युद्ध दीर्घकाळ चालले, तर देशात अन्नाचा तुटवडा अथवा भुखमारीची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी इराणने आपला अन्नपुरवठा ( ) सुरक्षित करण्यावर भर दिला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मरीन ट्रॅकिंग डेटानुसार, 15 आणि 16 मार्च दरम्यान किमान 6 जहाजे होर्मुजमधून इराणच्या इमाम खुमैनी बंदरावर पोहोचली. 9 मार्चनंतरही अनेक जहाजे पर्यायी मार्गाने माल उतरवून परतली आहेत. यांमध्ये कॅनडातील सोयाबीनचाही समावेश आहे. ही जहाजे येण्याचा अर्थ, इराण देशांतर्गत अन्नपुरवठा सुरू ठेऊ इच्छितो.
महत्वाचे म्हणजे, हेही लक्षात घ्यावे लागले की, इराण आपल्या अन्न गरजांचा एक मोठा भाग स्वतःच तयार करतो. तसेच, धान्य आणि तेलबिया आयात करतो, ज्यांचा उपयोग स्वयंपाकाचे तेल आणि जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो.
...यावरून इराणने दीर्घकालीन संघर्षाची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येते!
खरेतर, इराणमध्ये शेती हा एक गंभीर प्रश्न आहे, कारण आहे पाण्याची कमतरता आणि हीच येथील शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. पाण्यची कमतरता. यामुळे इराण दरवर्षी ब्राझीलमधून 8 ते 10 दशलक्ष टन मका आयात करतो. युद्धापूर्वीच इराणने 4 दशलक्ष टन गव्हाचा साठा केला आहे, जो त्यांची 4 महिन्यांपर्यंतची गरज भागवू शकतो. या सर्व हालचालींवरून इराणने दीर्घकालीन संघर्षाची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे